कोरोना' मुळे शहरातील पंचतारांकित हॉटेल खाली खाली

Foto

औरंगाबाद : 'कोरोना' च्या दहशतीमुळे औरंगाबाद शहरातील पर्यटन व्यवसाय अक्षरशः कोलमडला आहे. शहरातील पंचतारांकित हॉटेल्स खाली आहेत. गाईड मंडळीना पर्यटक महाग झाले आहेत. पर्यटकांच्या अनुषंगाने फुलणारे सारे व्यवसाय कोमेजल्यागत आहेत. त्यामुळे शहराच्या अर्थकारणाला फार मोठा फटका बसण्याचा धोका निर्माण झाला आहे.

चीनमध्ये 'कोरोना' चा उदभव झाल्यामुळे त्याचे विषाणू खुप वेगाने जगभर धुमाकूळ घालत आहेत. जगातील अनेक देशांमध्ये 'कोरोना' ने शिरकाव केला असून भारतामध्ये ही 'कोरोना' चे विषाणू हातपाय पसरत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील पंचतारांकित हॉटेल्स आणि या व्यवसायाशी संबधितांशी ' दैनिक सांजवार्ता' ने चर्चा केली त्यावेळी शहरातील पर्यटन व्यवसाय डबघाईला आल्याचे स्पष्ट झाले. 'कोरोना' देशात थैमान घातल्यामुळे अनेकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात औरंगाबाद शहर हे पर्यटनाची राजधानी असल्याने हजारो पर्यटक देश -विदेशातून शहरात येतात. शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये राहतात. परंतु कोरोना आजाराची पर्यटकांमध्ये भीती निर्माण झाल्याने परदेशी पर्यटकांचा ओघ आटला आहे. जवळपास ७० टक्के पर्यटकानी शहराकडे पाठ फिरवली असल्याचे औरंगाबाद टूरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन चे अध्यक्ष जशवंत सिंग यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना सांगितले.

औरंगाबाद शहरात प्रति महिन्याला हजारो पर्यटक हजेरी लावतात. त्यात ट्रॅव्हलस, हॉटेल फुल होतात. परंतु काही महिन्यांपासून कोरोना आजाराची भीती सर्वत्र पसरलेली आहे. याचा परिणाम विविध व्यवसायांवर होताना दिसत आहे. त्यातल्या त्यात दहावी, बारावी परीक्षा संपताच अनेक पर्यटक बाहेर जाण्याचा बेत आखतात. परंतु कोरोनाची भीतीमुळे अनेकांनी विदेशात जाण्याचे रद्द केले आहे. तर येणाऱ्या पर्यटकांचीही संख्या कमी झाली आहे. जवळपास ७० टक्के पर्यटक कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यात जाणाऱ्या पर्यटक एप्रिलमध्ये बाहेर जातात त्यांची मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स, ट्रॅव्हल्ससाठी बुकिंग होते. मात्र त्यावर ७० टक्के परिणाम झाला आहे. तर येणाऱ्या पर्यटकांचा ओघ हा मार्च महिन्यात सर्वाधिक असतो. परंतु त्यावरही परिणाम झाला असून ७० टक्के पर्यटक कमी झाले आहेत. याचा परिणाम हॉटेल व्यवसायावर झाला आहे. बुकिंगही अत्यंत कमी झाल्याचे जशवंत सिंग यांनी सांगितले.
विदेशी पर्यटकांची पाठ

कोरोना आजाराच्या भीतीने विदेशी पर्यटकांनी पर्यटन स्थळांना भेटी देण्याला फुलस्टॉप दिला आहे. शहरात येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या डिसेंबर पर्यत चांगली होते. परंतु आता ती अत्यंत कमी झाली आहे. त्यात जपान, कोरिया, थायलंड, युरोपियन पर्यटकांनी शहराकडे पाठ फिरवली आहे. त्याचा परिणाम हॉटेल बुकिंग कमी झाल्याचे जशवंत सिंग यांनी स्पष्ट केले.







Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker